dr.satish best web design developer for mac

नंदनवाड ग्रामपंचायत :

नंदनवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेस कर्नाटकच्या सिमालगत वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावची ग्रामपंचायत 1975 सालापासून कार्यरत आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने गावात शासनाचे विविध उपक्रम आणले. व त्यातून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नंदनवाड ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली व त्यातून गावाला एक वेगळेच स्वरूप मिळाले आहे. नंदनवाड या गावातील लोकांना कन्नड व मराठी अतिशय उत्तम बोलता येते. गावातील लोक अतिशय प्रेमळ व बंधुभावाने एकत्र राहतात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

नंदनवाड ग्रामपंचायत ही 1975 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 359 असून गावाची लोकसंख्या 1468 इतकी असून ती 3 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहे.

सरपंच
सौ. दुंडवा शामराव सलामवाडे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. श्रीमंत बसाप्पा पुजारी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. दत्ता कृष्णा पाटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Nandanwad Grampanchayat
A/p Nandanwad Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone :7507048099

Office : 02327 – 264745